News Flash

‘केजीएफ: चॅप्टर टू’चे शुटिंग सुरू

'केजीएफ: चॅप्टर २'च्या शुटिंगाला सुरूवात

‘केजीएफ: चॅप्टर टू’चे शुटिंग सुरू
अभिनेता यशचा 'केजीएफ: चॅप्टर २'

सध्या बॉलिवूडसहित इतर चित्रपट इंडस्ट्रीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची चलती पहायला मिळते. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘केजीएफ: चॅप्टर वन’. या चित्रपटाने दक्षिणेकडेच नव्हे तर संपूर्ण देशभरात अक्षरश: धुमाकूळच घातला होता. आता चित्रपटाचा ‘केजीएफ: चॅप्टर टू’ येणार असल्याचे समोर येत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना हा सुखद धक्काच आहे.

चित्रपट निर्मात्यांनी ‘केजीएफ: चॅप्टर २’च्या शुटिंगाला सुरूवात केली असल्याने अभिनेता यशने ट्विट केले आहे. ‘आणि आता सुरूवात झाली. केजीएफ-१ला सर्वांकडून प्रेम मिळाले. आता चॅप्टर-२ डबल धमाल करण्यासाठी तयार आहे. यासाठी तुमचा आशिर्वाद आणि प्रेम फार गरजेच आहे’ असे अभिनेता यशने ट्विट केले. हा चित्रपट याच वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तसेच चित्रपटात अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रविना टंडन झळकण्याचीही चर्चा सुरु आहे.

‘केजीएफ: चॅप्टर वन’ हा १९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील पीरियड ड्रामा असून एका अनाथ माणसाची कथा आहे. अप्रतिम अभिनय, सुंदर दृश्ये आणि मनोरंजक कथेच्या संगमामुळे या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून दक्षिणात्य सुपरस्टार यश प्रमुख भूमिकेमध्ये होता. श्रीनिधी शेट्टी, रामचंद्र राजू यांच्यासह मौनी रॉयनेही या चित्रपटातून उत्‍तम परफॉर्मन्स दिला आहे.

‘केजीएफ: चॅप्टर वन’ आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. पण किंग खानच्या या चित्रपटाला कन्नड चित्रपटाने मागे टाकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 10:47 am

Web Title: after massive success of kgf chapter 1 shooting start for kgf chapter 2
Next Stories
1 ‘कलंक’ ठरला २४ तासांत सर्वाधिक पाहिला गेलेला टीझर
2 ‘कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता’
3 शैक्षणिक घोटाळ्यात अडकल्या अमेरिकेतील या दोन नामवंत अभिनेत्री
Just Now!
X