News Flash

नेहा कक्करनंतर आदित्य नारायण अडकणार लग्न बंधनात

जाणून घ्या त्याच्या गर्लफ्रेंड विषयी..

काही दिवसांपूर्वीच नेहा कक्करने बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार असल्याची कबुली दिली. रोहनप्रीत पूर्वी इंडियन आयडलच्या सेटवर नेहा आणि गायक आदित्य नारायण यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता नेहा पाठोपाठ गायक आदित्य नारायण देखील लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. खुद्द आदित्यने याबाबत माहिती दिली आहे.

नुकताच आदित्यने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले आहे. आदित्य या वर्षाच्या शेवटी गर्लफ्रेंड, अभिनेत्री श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे. ‘मी माझे नाते कधी गुपित ठेवलेले नाही. पण एक वेळ अशी आली की आमच्याबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही यावर न बोलण्याचा विचार केला होता’ असे आदित्य म्हणाला.

त्यानंतर त्याने त्याची आणि श्वेताची ओळख कुठे आणि कशी झाली हे सांगितले आहे. ‘शापित चित्रपटाच्या सेटवर माझी आणि श्वेताची ओळख झाली. सुरुवातीला आमच्यामध्ये मैत्रीचे नाते होते आणि आम्हाला आमच्या करिअरवर लक्ष द्यायचे होते. गेल्या १० वर्षात आमच्या आयुष्यात अनेक चढ-उतरु आले. येत्या डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आम्ही लग्न बंधनात अडकणार आहोत. माझ्या कुटुंबीयांना श्वेता आवडते’ असे आदित्य पुढे म्हणाला.

आदित्य हा प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आहे. तो देखील गायक आणि अभिनेता आहे. त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडलचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचवेळी शोमध्ये नेहा कक्कर परिक्षक म्हणून काम करत होती. त्यावेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नेहाने वक्तव्य करत या सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला होता. आदित्यची गर्लफ्रेंड श्वेता ही एक अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 11:27 am

Web Title: after neha kakkar singer aditya narayan is getting married avb 95
Next Stories
1 ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत होणार ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एण्ट्री
2 सलमानने लग्नाविषयी केला खुलासा; “माझं लग्न झालं आहे, पण…”
3 करण जोहरपासून लांब राहण्याचा सल्ला देणाऱ्याला दिव्यांकाचं सडेतोड उत्तर
Just Now!
X