संजय लीला भन्साळी यांच्या बिग बजेट चित्रपटांच्या यादीत सर्वाधिक यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे ‘पद्मावत’. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून ते अगदी पार्श्वसंगीत आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट आणखी एका कारणामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. ते कारण म्हणजे चित्रपटातील ‘घुमर’ गाणं. या गाण्याची लोकप्रियता इतकी वाढली की सोशल मीडियावर अनेकांनीच त्याचे विविध व्हर्जन सादर केले.

‘पद्मावत’मधील ‘घुमर’ गाण्यावर ठेका धरत कोणी आइस स्केटींग केले, तर कोणी हटके अंदाजात या गाण्याचे मीम व्हायरल केले. गाण्याला मिळालेली हीच लोकप्रियता पाहता मुंबईत नुकतेच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संतरामपूरच्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या दिवंगत राजमाता गोवर्धन कुमारी यांनी स्थापन केलेल्या ‘गंगौर घुमर अकॅडमी’ने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये ‘घुमर’ नृत्यात पारंगत असणाऱ्या ज्योती तोमर यांचीही विशेष उपस्थिती होती.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

ज्योती यांनी ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वेळी घुमर नृत्यासाठी कृती महेश मिद्या या नृत्यदिग्दर्शिकेला मार्गदर्शन केले होते. कार्यशाळेत घुमर नृत्य शिकण्यासाठी अनेक महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडिओमध्ये ज्योती तोमर आणि घुमर नृत्य शिकण्यासाठी आलेल्या महिला मोठ्या नजाकतीने घुमर नृत्य करताना दिसत आहेत. पारंपरिक राजस्थानी वाद्य आणि नृत्याचा ठेका याची सुरेख सांगड घालत हे घुमर नृत्य सादर केल्याचे पाहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर या अनोख्या आणि तितक्याच लक्षवेधी घुमर नृत्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे.