News Flash

झोया मोरानीने केले दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेशन

सोशल मीडियाद्वारे दिली माहिती.

करोना व्हायरचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पण अशातच काही लोकांनी करोनावर मात केल्याचे देखील समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते करिम मरोनी यांची मुलगी झोया मोरानीला करोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली होती. पण झोयाने करोनावर मात केली. तिची दुसरी करोना चाचणी निगेटीव्ह आली. त्यानंतर तिने करोनाशी झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी प्लाझ्मा डोनेशन केले होते. आता पुन्हा एकदा झोया प्लाझ्मा डोनेट करत आहे.

झोयाने करोनावर मात केल्यानंतर ती इतर करोनाग्रस्तांना जमेल त्या पद्धतीने मदत करत आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्यामुळे तिने रक्त दान करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा तिने मदतीचा हात पुढे केला आहे. नुकताच झोयाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केल्याचे सांगितले आहे.

प्लाझ्मा डोनेशन फेरी २. गेल्या वेळी मी प्लाझ्मा डोनेट केला होता तेव्हा एका रुग्णाला ICU मधून बाहेर येण्यास मदत झाली होती. करोनावर मत केलेल्या व्यक्तीने जर प्लाझ्मा डोनेट केला तर नक्कीच कोणाचा तरी जीव वाचेल असे मला डॉक्टरांनी म्हटले असल्याचे झोयाने पोस्टमध्ये लिहिले आहे.

काय आहे प्लाझ्मा थेरपी?

विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अ‍ॅण्टिबॉडीजदेखील असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य आक्रमणाला परतवून लावण्यात आघाडीवर असतात. एकदा तसे झाले की आपल्या रक्तपेशी पुन्हा त्याच प्रकारचे आक्रमण झाले तर आधीच आक्रमण लक्षात ठेवून वेळीच शत्रूला ओळखतात आणि त्याचा प्रतिकार करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 5:49 pm

Web Title: after recovered from covid 19 zoa morani donated plasma for the second time avb 95
Next Stories
1 पिक्चरसाठी कायपण! एका स्टंटसाठी दिग्दर्शकानं घडवला खरा विमान अपघात
2 अशा प्रकारे किरण कुमार यांनी केली करोनावर मात, सांगितला अनुभव
3 Video : बिग बी-आयुषमानमध्ये ‘जूतम फेंक’; गुलाबो सिताबोचं पहिलं गाणं प्रदर्शित
Just Now!
X