08 March 2021

News Flash

#KesariTrailer: अक्षय म्हणतो ‘मेरी पगडी केसरी’ तर अजय म्हणे ‘मेरी जुबान भी केसरी’; व्हायरल मिम्स

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तासाभरात मिम्स झाले व्हायरल

व्हायरल मिम्स

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘केसरी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक विरुद्ध दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत अविश्वसनीय अशा शौर्यगाथेची कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार परिणीती- चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे. या अॅक्शनपॅक ट्रेलरला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. मात्र त्याच वेळी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तासाभरामध्ये या ट्रेलरमधील संवांदांवरुन मिम्सही व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहेत. अगदी पाकिस्तान, अजय देवगण, मोदी, अभ्यास, दहावी-बारावी परिक्षा, आयुष्यातील अडचणी, आयपीएल अशा अनेक विषयांवर या ट्रेलरमधील संवादाच्या माध्यमातून मिम्स तयार करण्यात आले आहेत. चला तर पाहुयात असेच काही व्हायरल मिम्स…

जगण्याची कारणे विरुद्ध मरण्याची कारणे

IPL vs PSL

जुबा केसरी

मित्रो १५ लाख

चल जुठा

२१ दिवसात पैसे डबल

मित्र म्हणतो मी अभ्यास केला नाही

केसरी नावामागील कथा

डायरेक्टर बोलतो तेव्हा

पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र यावर सिद्धू म्हणतात…

ड्रायव्हर गाडी चालवत होता

झारामध्ये सेल लागतो तेव्हा

त्याची आई म्हणते…

जेव्हा स्टारबक्स १०० रुपयात कॉफी देते

१० वी नंतर मज्जाच मजा

दरम्यान हा सिनेमा भारताच्या इतिहासात लढलेल्या सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय सारागढीच्या युद्धाच्या सत्य घटनेवर आधारित आहे. १० हजार सैन्याच्या रुपानं मृत्यू समोर असतानाही न डगमगता या २१ वीरांनी शेवटच्या श्वसांपर्यंत लढा देत आपलं नाव इतिहासात सुवर्णाक्षरात अजरामर केलं. ही शौर्यगाथा ‘केसरी’ सिनेमाच्या माध्यमातून २१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.. अक्षय कुमारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटापैकी ‘केसरी’ एक आहे. या चित्रपटासाठी अक्षयनं खूपच मेहनत घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:41 pm

Web Title: after release of kesari trailer memes went viral
Next Stories
1 या तारखेला प्रदर्शित होणार ‘द स्काय इज पिंक’
2 ‘सोनचिडिया’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात
3 मुलीला पोलिओचा डोस देण्यास नकार, फवाद खानविरोधात एफआयआर दाखल
Just Now!
X