25 February 2021

News Flash

वरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली ‘ही’ गोष्ट

पाहा, नेटकऱ्यांनी नेमकं काय सर्च केलं

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल या दोघांनी अखेर नव्या वर्षात लग्नगाठ बांधली. २४ जानेवारीला अलिबागमध्ये या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे या दोघांचं लग्न ठरल्यापासून नेटकरी नताशा दलाल कोण हे गुगलवर सर्च करत होते. यात तिची जातदेखील सर्च केल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, आता वरुण-नताशाचं लग्न झाल्यानंतर नेटकऱ्यांनी एक नवीनच गोष्ट सर्च केल्याचं समोर आलं आहे.

वरुण-नताशाचं लग्न झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या दोघांविषयी अनेक गोष्टी सर्च केल्या आहेत. मात्र, यात सगळ्यात जास्त सर्च नताशाच्या वडिलांविषयी करण्यात आलं आहे. नताशाचे वडील राजेश दलाल नेमके कोण आहेत हे मोठ्या प्रमाणावर सर्च झालं आहे. इतकंच नाही तर त्यांचा व्यवसाय काय किंवा त्यांची कमाई किती हेदेखील सर्च झालं आहे.

दरम्यान, नताशा दलाल गौरी दलाल आणि राजेश दलाल यांची लेक आहे. तिचे वडील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. संपूर्ण देशभरात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार झालेला आहे. विशेष म्हणजे दलाल कुटुंबाचा बॉलिवूडशी कोणताही संबंध नाही. नताशा आणि वरुण यांचा प्रेमविवाह आहे.

वाचा : एस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

नताशाने मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तसंच तिने फॅशन डिझायनिंग क्षेत्रात पदवीदेखील मिळवली आहे. सध्या तिचं नताशा दलाल लेबल या नावाने कपड्यांचा ब्रँण्ड आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 9:10 am

Web Title: after varun dhawan and natasha dalal wedding people searching his facts on google ssj 93
Next Stories
1 एस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
2 “मिस्टर 56′ यांनी गेल्या अनेक महिन्यात…”; राहुल गांधींनी लगावला टोला
3 लवकरच उलगडणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा; ‘हरिओम’चं पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X