News Flash

‘तू तुझ्या वयाच्या अभिनेत्रींसोबत कधी काम करणार?’ सोफियाने सलमानला केला सवाल

सोशल मीडिया पोस्टद्वारे तिने सलमानच्या राधे चित्रपटावरदेखील टीका केली आहे.

तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

मॉडले सोफिया हयात ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो हे कायम चर्चेचा विषय ठरतात. नुकताच सोफियाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये सोफीयाने सलमान खान त्याच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत काम कधी करणार? असा सवाल केला आहे. तसेच तिने सलमानच्या राधे चित्रपटावर टीका केली आहे.

सोफियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमानसाठी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ‘पुन्हा एकदा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सलमानने जुन्या ट्रिकचा वापर केला आहे. त्याने पुन्हा ईदच्या दिवशीच चित्रपट प्रदर्शित केला. त्याने तिच बोरिंग कथा आणि लूकचा वापर चित्रपटात केला आहे’ असे सोफियाने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘किसिंग, लव्हमेकिंग सीन कट म्हटल्यानंतर…’, परिणितीने सांगितला शुटींगदरम्यानचा अनुभव

 

View this post on Instagram

 

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

आणखी वाचा : ‘मला विराट द्या’, त्या पाकिस्तानी चाहतीने केली होती अजब मागणी

सोफियाने पोस्टमध्ये सलमानचा ‘राधे’ चित्रपट पाहून नवीन काहीच पाहायला मिळाले नाही असे म्हटले आहे. ‘राधे चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला जाणावले की मी आधीदेखील असे सीन्स पाहिले होते. सलमान नेहमी त्याच्या चित्रपटात तरुण अभिनेत्रींसोबत काम करताना दिसतो. तू तुझ्या वयाच्या अभिनेत्रीसोबत कधी काम करणार? आता त्याचा चाहता वर्ग त्याच्या नेहमीच्या बोरिंग कथा पाहून कंटाळला आहे’ असे सोफिया म्हणाली.

पुढे अभिनेता रणदीप हुड्डा विषयी बोलताना ती म्हणाली, ‘चित्रपटात रणदीप हुड्डाला पाहून वाईट वाटले. तो एक उत्तम अभिनेता आहे. पण या चित्रपटातील त्याचा रोल हा फारसा कोणाला आवडला नाही. त्याने ही भूमिका करण्यास होकार दिला कारण हा सलमान खानचा चित्रपट होता? ही संपूर्ण इंडस्ट्रीची समस्या आहे. चित्रपटातील रणदीपचे पात्र योग्य पद्धतीने लिहिले गेलेले नाही असे जर तो बोलला तर त्याला इंडस्ट्रीमधून बाहेर काढले असते?’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 5:18 pm

Web Title: after watching radhe sofia hayat attack on salman khan why did not he cast a heroin of his age avb 95
Next Stories
1 या कारणामुळे नुसरतने तो टॅट्यू ठेवलाय अपूर्ण
2 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका वादाच्या भोवऱ्यात, त्या दृश्या विरोधात तक्रार
3 १६ वर्षीय अभिनेत्रीवर फिदा होते राजेश खन्ना; डिंपल यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी
Just Now!
X