28 February 2021

News Flash

‘माझा अगडबम’चे शीर्षकगीत प्रदर्शित

'नाजुका'च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

नावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, ‘नाजुका’च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सुपरहिट ‘अगडबम’ च्या सिक्वेलमधून ती पुन्हा येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे शीर्षकगीत समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे हे शीर्षकगीत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘आसमान का थरथरते..’ असे बोल असलेले हे दमदार शीर्षकगीत मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याला टी. सतीश चक्रवर्ती यांचे प्रभावी संगीत लाभले आहे. शिवाय अपेक्षा दांडेकरच्या दमदार आवाजामुळे हे गाणे अधिकच वजनदार बनले आहे. गुणी अभिनेत्री तृप्ती भोईरवर चित्रित करण्यात आलेले हे शीर्षकगीत प्रेक्षकांना ठेका धरण्यास भाग पाडते. ‘माझा अगडबम’ या सिनेमात गुणी अभिनेत्री तृप्ती भोईरची प्रमुख भूमिका असून, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माती अशा चार वेगवेगळ्या भूमिकांतून ती लोकांसमोर येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  ‘अगडबम’ च्या दमदार यशानंतर डबल धमाका करण्यास येत असलेला हा ‘माझा अगडबम’ येत्या २६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:47 am

Web Title: agadbam 2
Next Stories
1 नष्टचर्य
2 धुरंधरांची थोरवी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी..
3 Happy Birthday Akshay Kumar : बॉलिवूडच्या ‘खिलाडी’बाबत काही रंजक गोष्टी
Just Now!
X