23 November 2020

News Flash

‘अग्गंबाई सासूबाई’ : निवेदिता सराफ यांना करोना झाल्याने मालिकेत केला ‘हा’ बदल

२८ सप्टेंबर पासून ते ४ ऑक्टोबरदरम्यान 'अग्गंबाई सासूबाई'चा सप्ताह विशेष भाग

निवेदिता सराफ

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक आसावरी, अभिजीत, शुभ्रा आणि बबड्या या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. या मालिकेतील कलाकारांवर येणारे मीम्सदेखील व्हायरल होत आहेत. आई, सून, सासू आणि बायको अशी प्रत्येक भूमिका बजावणारी आसावरी म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांना करोनाची लागण झाली. त्या सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये असून त्यांच्या अनुपस्थितीत मालिकेत अनोख्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

२८ सप्टेंबर पासून ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘अग्गंबाई सासूबाई’चा सप्ताह विशेष भाग दाखवण्यात येणार आहेत. त्यात सेटवरील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी एकमेकांची काळजी घेऊन कसं शूटिंग करतात ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत आसावरी सेटवर असताना इतरांची कशाप्रकारे काळजी घ्यायच्या, हेदेखील मालिकेत रेखाटण्यात येणार आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच निवेदिता यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्यांना कोणतीच लक्षणं जाणवत नसून त्या सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहत आहेत.

हा सप्ताह विशेष भाग प्रेक्षकांना २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर रात्री ८.३० वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 6:06 pm

Web Title: aggabai sasubai changes done in the serial after nivedita saraf tested covid 19 positive ssv 92
Next Stories
1 ‘केबीसी’मध्ये बिग बींनी पहिल्याच स्पर्धकाला विचारला सुशांतविषयी ‘हा’ प्रश्न
2 “त्या वेळी रामदास आठवले कुठे होते?”; ‘तो’ फोटो पाहून स्वरा भास्कर संतापली
3 दिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून…
Just Now!
X