बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे सर्वांचे आवडते कपल आहेत. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक ऐश्वर्याला डान्स करण्यासाठी खेचत घेऊन जाताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये अभिषेक एका पुरस्कार सोहळ्यामध्ये स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. तेवढ्यात तो स्टेजवरुन खाली उतरतो आणि ऐश्वर्याला खेचत त्याच्यासोबत डान्स करण्यासाठी स्टेजवर घेऊन जातो. एका फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून तेथे उपस्थित असलेले कलाकार त्यांना चीयर करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंच ३ लाखा पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
ऐश्वर्याने ‘फन्ने खान’ या चित्रपटात काम केले होते. पण या चित्रपटाने बॉक्य ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता ती लवकरच मणिरत्नम दिग्दर्शित ‘गुलाब जामुन’ या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिषेकचा काही दिवसांपूर्वी ‘लुडो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली. लवकरच तो ‘दसवी’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्याचबरोबर ‘द बिग बुल’ आणि ‘बॉब बिस्वास’मध्ये देखील तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.