News Flash

मी तंबाखूचा प्रचार करत नाही- अजय देवगणचा खुलासा

सध्या अजय त्याचा आगामी चित्रपट 'दे दे प्यार दे' या चित्रपटाच्या प्रमोशसनमध्ये व्यग्र आहे

अजय देवगण

अभिनेता अजय देवगणने त्याच्या आता पर्यंतच्या कारकिर्दीत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यातील एक जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे. या जाहिरातीतून अजय तंबाखूचा प्रचार करत असल्याची टीका होत आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अजयने मौन सोडण्यासाठी ‘मी तंबाखूचा प्रचार करत नाही’ असे प्रत्युत्तर दिले आहे.

अजय कर्करोगाने पिडित असलेल्या चाहत्याच्या संपर्कात असल्याचा खुलासा त्याने केला आहे. तसेच त्याने या जाहिरातीच्या करारामध्ये तंबाखूचा प्रचार करणार नसल्याचे देखील म्हटले आहे. ‘मी माझ्या करारामध्ये नेहमी म्हटले आहे की मी तंबाखूचा प्रचार करणार नाही. मी प्रचार करतो ती वेलचीची. माझ्या करारात असे म्हटले गेले आहे की या पदार्थामध्ये तंबाखू नाही. जर हीच कंपनी दुसऱ्या पदार्थांची विक्री करत असले तर त्या बद्दल मला माहिती नाही’ असा खुलासा अजय देवगणने केला आहे.

दरम्यान मी चित्रपटात धूम्रपान करणे टाळणेल परंतु कधी गरज लागली तर कामाचा भाग म्हणून ते पार ही पाडेल असे तो पुढे म्हणाला. ‘माझा आगामी चित्रपट दे दे प्यार देमध्ये मी एका सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे जो धूम्रपान करत नाही. पण जर पुढे कधी “कंपनी”सारख्या चित्रपटात मला मलिक भाईची भूमिका साकारावी लागली तर धूम्रपानाशिवाय या भूमिकेला न्याय कसा मिळेल? कोणाचेही नाव न घेता एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्या व्यक्तिरेखेच्या सर्व गोष्टी साद्य कराव्या लागतात’ असे अजय पुढे म्हणाला.

राजस्थानमध्ये राहणाऱ्या नानकराम या कर्करोगग्रस्त व्यक्तीने “समाजाच्या कल्याणासाठी तंबाखू उत्पादनाची जाहिरात करु नका”, असे आवाहन अजयला केले होते. त्यासोबतच अजय देवगणला संबोधित करत जयपूरच्या सांगानेर, जगतपुरा आणि इतर जवळपासच्या परिसरामध्ये एक हजार पत्रक वाटले आणि भितींवर लावले होते. यामध्ये तंबाखूचे सेवन केल्याने त्याचे परिणाम आणि त्याच्यामुळे कुटुंबावर ओढावलेली स्थिती याबाबतची माहिती देण्यात आली होती. पत्रकात त्याने मद्य, सिगारेट आणि तंबाखू-गुटखा यांसारख्या अंमली पदार्थांच्या जाहिराती करणे चुकीचे आहे असे देखील म्हटले होते.

सध्या अजय त्याचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाच्या प्रमोशसनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये अजयसह तबू आणि राकूल प्रीत सिंग दिसणार आहेत. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन अकिव अली करणार आहेत. त्यानंतर अजय ‘RRR’ या चित्रपटात काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 12:35 pm

Web Title: ajay devgn reacts to fans stop endorsing tobacco appeal
Next Stories
1 राखी सावंत म्हणते, जर मला ट्रोल केलं तर…
2 एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही- शरद पोंक्षे
3 बाजीराव-मस्तानी पुन्हा एकदा एकत्र, ‘या’ चित्रपटात करणार स्क्रीन शेअर
Just Now!
X