News Flash

अभिनेता एजाज खानला अटक

आठ तास चौकशी केल्यानंतर ठोकल्या बेड्या

संग्रहित (Express photo by Narendra Vaskar)

अभिनेता एजाज खान केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी मंगळवारी विमानतळावरून एजाज खानला ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात एनसीबीने शादाब शेख उर्फ शादाब बटाटा या अंमलीपदार्थ विक्रेत्याला अटक केली होती. चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींना मागणीप्रमाणे विविध अंमलीपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी शादाब प्रसिद्ध होता. त्याच्या चौकशीतून अभिनेता एजाजचे नाव पुढे आले होते.

मंगळवारी राजस्थानहून मुंबई विमानतळावर उतरताच एजाज याला एनसीबी पथकाने ताब्यात घेतलं. त्याच्याकडे एनसीबीच्या विभागीय कार्यालयात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. यानंतर त्याला अटक करण्यात आली. एनसीबीकडून एजाजशी संबंधित अंधेरीमधील लोखंडवाला येथील अनेक ठिकाणांवर धाडदेखील टाकण्यात आली.

आठ तास चौकशी केल्यानंतर एजाज खानला अटक करण्यात आल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. फारुख बटाटा याचीदेखील याप्रकरणी आठ तास चौकशी करण्यात आली होती. पण चौकशीनंतर त्याला सोडण्यात आलं होतं. त्याचा मुलगा शादाब याला मात्र गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.

अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही
ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानचं नाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१८ मध्ये बिग बॉसचा स्पर्धक राहिलेल्या एजाज खानना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबईतील एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले होते.
तर २०२० मध्ये फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. फेसबुक लाईव्हदरम्यान केलेल्या कमेंटनंतर खार पोलिसांनी त्याला समन्स बजावलं होतं. यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 10:03 am

Web Title: ajaz khan arrested by ncb in drug case sgy 87
Next Stories
1 फिल्म फेअर मिळाल्यानंतर अलाया ट्रोल, नेटकरी म्हणाले “किती पैसै दिले?”
2 अभिनेता एजाज खान ‘एनसीबी’च्या ताब्यात
3 Ajaz Khan : बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड, अभिनेता एजाज खानला एअरपोर्टवरून घेतलं ताब्यात!
Just Now!
X