दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान आंदोलकांनी राज्यात ठिकठीकाणी दूधाचे टँकर फोडून आपला असंतोष व्यक्त केला आहे. या आंदोलनादरम्यान केल्या जाणाऱ्या दूधाच्या नासाडीबाबत अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने संताप व्यक्त केला आहे. दुधाची नासाडी करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, अशी टीका तिने केली आहे.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

अवश्य पाहा – ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अमेरिकेतील डॉक्टर करतोय रुग्णांची सेवा; अवधूत गुप्तेने केलं कौतुक

टँकर फोडून दूध रस्त्यांवर सोडलं जात आहे. या नुकसानाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. होणारे नुकसान पाहून अभिनेत्री आकांक्षा पुरी संतापली. “हा व्हिडीओ पाहून माझं रक्त खवळतंय. दूध वाया जातंय. आंदोलनाच्या नावाखाली नुकसान करणाऱ्या या लोकांना लाज वाटायला हवी. इथे कित्येक लोक अन्नाशिवाय मरतायत आणि यांना नुकसान करायचं सुचतंय. ही माणसं मुर्ख आहेत.” अशा आशयाचं ट्विट करुन आकांक्षाने जोरदार टीका केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी मंगळवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनामध्ये हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून देण्यात येत आहे. राज्यात गेल्या चार महिन्यांपासून ‘करोना‘मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे, असं आंदोलनकर्त्यांचे म्हणणं आहे.