यंदाचं संपूर्ण वर्ष बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमारसाठी खास ठरलं. ‘मिशन मंगल’, ‘केसरी’, ‘हाऊसफुल ४’ नंतर आता ‘गुड न्यूज’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरतोय. नुकताच प्रदर्शित झालेला ‘गुड न्यूज’ हा चित्रपट खऱ्या अर्थाने अक्षयसाठी गुड न्यूज देत आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. सलमान खानच्या बहुचर्चित ‘दबंग ३’ या चित्रपटालाही अक्षयचा ‘गुड न्यूज’ मागे टाकेल असं चित्र सध्याच्या कमाईवरून दिसत आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘गुड न्यूज’ने दोन दिवसांत ३९.३४ कोटी रुपये कमावले आहेत. शुक्राणूंची अदलाबदल या एका घटनेभोवती बांधलेल्या या कथेत अक्षयसोबत करीना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांज यांच्या मुख्य भूमिका आहेत. कमाईचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अक्षयचा ‘गुड न्यूज’ सलमानच्या ‘दबंग ३’वर भारी पडेल असं म्हणायला हरकत नाही.

वारसा पुढे नेण्यासाठी असलेले मुलाचे महत्त्व आणि त्याचभोवती वर्षांनुवर्ष-पिढय़ान्पिढय़ा गुंतून बसलेली कुटुंबव्यवस्था यावर ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या माध्यमातून लेखिका ज्योती कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांनी नेमके बोट ठेवले आहे.

‘गुड न्यूज’ची आतापर्यंत झालेली कमाई- 

शुक्रवार- १७.५६ कोटी रुपये

शनिवार- २१.७८ कोटी रुपये