खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. त्याची मुख्य भूमिका असलेला लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या अक्षय आणि अभिनेत्री कियारा आडवाणी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.यातच अक्षयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो वूंपला या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. यात प्रमोशनमधून थोडासा वेळ काढत अक्षय कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. त्यामुळे सध्या अक्षयचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात आहेत.

दरम्यान, अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातील बुर्ज खलिफा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.