20 September 2018

News Flash

Padman Song: पुन्हा एकदा मोठी स्वप्नं पाहायला लावतोय अक्षय कुमार

प्रयत्नांशिवाय स्वप्न साकार होत नाहीत

अक्षय कुमार, पॅडमॅन

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार त्याच्या आगामी सिनेमातून आणखी एक प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसांपासून याच सिनेमाची सर्वत्र चर्चा होत आहे. चर्चा होण्यामागचे कारणही विशेष आहे. ‘पॅडमॅन’ सिनेमात ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशिनची निर्मिती करणारे अरुणाचलम मुरुगानंथम यांची कथा दाखवण्यात आली आहे. या सिनेमाचे ‘साले सपने’ गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Gold
    ₹ 25900 MRP ₹ 29500 -12%
    ₹3750 Cashback
  • Lenovo K8 Plus 32GB Venom Black
    ₹ 9597 MRP ₹ 10999 -13%
    ₹480 Cashback

हे गाणे मोठी स्वप्न पाहण्यासाठी प्रोत्साहीत करणारे आहे. या गाण्यात अक्षय सॅनिटरी नॅपकीनचे मशीन तयार करताना दिसतो. अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘प्रयत्नांशिवाय स्वप्न साकार होत नाहीत. हे गाणं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आहे.’

एक सामान्य माणूस त्याच्या असामान्य कल्पनाशक्तीच्या आधारावर काय कमाल करू शकतो हे या गाण्यात आपल्याला पाहायला मिळेल. सारे सपने हे गाणे मोहित चौहानने गायले असून अमित त्रिवेदीने या गाण्याला संगीत दिले आहे. याआधी आज से तेरी आणि हू ब हू ही गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. अक्षयच्या चाहत्यांना हे गाणे फार आवडले होते.

स्त्री-स्वातंत्र्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लो कॉस्ट सॅनिटरी पॅड मूव्हमेंट’ ठरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करणारे कोईम्बतूर येथील अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्यावर ‘पॅडमॅन’ सिनेमा आधारित आहे. राधिका आपटे सिनेमात अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. ‘चिनी कम’ आणि ‘पा’ सारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे देणारे आर. बाल्की यांनी ‘पॅडमॅन’चे दिग्दर्शन केले आहे. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना ही या सिनेमाची निर्माती आहे. अरुणाचलम् यांना शोधण्यापासून सिनेमासाठी तयार करण्यापर्यंतची महत्त्वाची जबाबदारी तिने पार पाडली.

First Published on January 14, 2018 2:50 pm

Web Title: akshay kumar padman movie new song saale sapne release