ईदच्या मूहुर्तावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. तसेच बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट त्याच दिवशी प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाउनमुळे या दोन्ही सुपरस्टारची बॉक्स ऑफिसवरची टक्कर होता होता राहिली. पण आता हे दोघे पुन्हा एकमेकांना टक्कर देणार असल्याचे म्हटले जात आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट येत्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. तसेच यश राज फिल्म अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट दिवाळीच्या मूहुर्तावर प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे.
करोनामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मालिकांचे तसेच चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले. त्याचबरोबर चित्रपटगृह देखील बंद करण्यात आले. त्यामुळे सलमानच्या राधे चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण राहिले. त्यामुळे ‘राधे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट देखील ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र आता करोनामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.