21 January 2021

News Flash

अक्षयने करीनाच्या अंगावर फेकला कॉफी मग?, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

(screengrab : instagram bollywoodactor1213)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री करीना कपूर खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय करीनाच्या अंगावर कॉफीचा मग फेकताना दिसत आहे. दरम्यान करीनाची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

अक्षय आणि करीनाचा हा व्हिडीओ ‘गूड न्यूज’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळचा असल्याचे म्हटले जात आहे. अक्षय बऱ्याचवेळा आपल्या को-स्टारसोबत मजामस्ती करताना दिसतो. असेच काहीसे त्याने करीनासोबत केले आहे.

‘बॉलिवूड अ‍ॅक्टर १२१३’ या इन्स्टाग्राम पेजने अक्षय आणि करीनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कॉफीचा रिकामा मग करीनाच्या दिशेने नेतो आणि त्यातील कॉफी तिच्या अंगावर फेकत असल्याचे तिला भासवतो. तो कप रिकामा असल्याचे करीना माहिती नसते. त्यामुळे ती दचकते. नंतर ते दोघेही हसताना दिसत आहेत. सध्या त्या दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 2:43 pm

Web Title: akshay kumar spill coffee from mug on kareena kapoor avb 95
Next Stories
1 दिशा पटानीचं वर्क फ्रॉम होम; घरी राहून करते ‘हे’ काम
2 अमाल मलिकने छेडले सलमान फॅन्सविरुद्ध ट्विटरवॉर?
3 नेपोटिझम वादाचा आणखी एका चित्रपटाला फटका; टिझरवर पडतोय डिसलाईकचा पाऊस
Just Now!
X