News Flash

शेतकरी आंदोलनावर गप्प का? नेटकऱ्यांनी खिलाडी कुमारला विचारला प्रश्न

सोशल मीडियावर अक्षय कुमार होतोय ट्रोल

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कलाविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेक कलाकारांना या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, या सगळ्यात अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. अक्षयने अद्यापही या आंदोलनावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून याच काळात त्याने एक जाहिरात शेअर केली आहे. ज्यामुळे त्याला ट्रोल व्हावं लागत आहे.

अलिकडेच अक्षयने सोशल मीडियावर ‘पगार बुक’ची एक जाहिरात शेअर केली. या जाहिरातीत मासिक वेतन, अडेंटेन्स आणि अॅडव्हान्स पेमेंट यासारख्या आवश्यक गोष्टींचा डिजिटल व्यवहार कसा करावा हे तो सांगताना दिसत आहे. यात ‘अब इंडिया का हर बिजनेसमॅन होगा डिजिटल’, असं म्हणताना तो दिसत आहे. त्याची ही जाहिरात पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ‘एकीकडे शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत. अशा काळात त्यांना पाठिंबा देण्याऐवजी तू जाहिराती कसल्या करतो’, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्याला विचारला आहे.

Next Stories
1 भरलग्नात आदित्यची झाली फजिती; वरमाला घालतांना फाटला पायजमा अन्…
2 प्रसिद्ध अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; उपचारासाठी चाहत्यांकडे मागितली मदत
3 ‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजीतमध्ये जुंपली
Just Now!
X