बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असतो. पण या वेळी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने शेअर कलेले काही फोटो चर्चेत आहे. या फोटोंमध्ये ट्विंकल कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. यामधील एका फोटोत अक्षयची मेहुणी दिसत आहे.

ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबीयांसोबत मजामस्ती करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील एका फोटोमध्ये ट्विंकल सोबत तिची बहिण रिंकी खन्ना दिसत आहे. हा फोटोशेअर करत ‘या सुट्ट्यांमधील सर्वात सुंदर भाग. जवळपास दीड वर्षांनंतर मी माझ्या बहिणीला भेटले. गेल्या काही दिवसांपासून आमची भेट झाली नव्हती’ या आशयाचे कॅप्शन ट्विंकलने दिले आहे.

या फोटोमध्ये ट्विंकलने ओवर साईज कलरफूल वन पिस परिधान केला आहे. त्यावर गळ्यात ज्वेलरी आणि गॉगल लावला आहे. तर रिंकीने ओवर साइज टॉप परिधान केला असून हॉट पँट घातली आहे. या लूकमध्ये दोघीही सुंदर दिसत आहेत. चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अक्षय कुमार आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी मालदीवला गेला होता. तेथील फोटो ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ट्विंकल अतिशय सुंदर दिसत होती. आता ते मुंबईला परतले असून ट्विंकल फोटो शेअर करताना दिसते.

रिंकी खन्ना ही ट्विंकलची लहान बहिण आहे. तिने १९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार मैं कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने पदार्पणनानंतर तिचे नाव बदलून रिंकल खन्ना असे केले होते. रिंकलने २००१मध्ये तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००३मध्ये रिंकलने समिर सरन या व्यावसायिकाशी लग्न केले. ती सध्या कुटुंबीयांसोबत युकेमध्ये राहते.