अक्षय कुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपट रसिकांवर चांगली छाप सोडली होती. परंतु, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला तशी करामत साधण्यात यश मिळेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. चित्रपटात पंजाबी तरुणाची भूमिका साकारणाऱ्या अक्षयची जोडी यावेळी अॅमी जॅक्सन या अभिनेत्रीबरोबर पाहायला मिळणार आहे. पंजाबी तरुणाच्या भूमिकेत अक्षय चपखल बसत असला तरी विनोदाच्या पातळीवर खास काही हाती लागत नसल्याचे हा ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर असलेल्या अॅमीने या चित्रपटात चांगले दिसण्याबरोबर हणामारीची दृष्येदेखील साकारली आहेत. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारपेक्षा थोड्या काळासाठी दिसणारा के के मेननच जास्त भाव खाऊन जातो. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘सिंग इज ब्लिंग’ चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात झळकत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2015 रोजी प्रकाशित
पाहा अक्षयच्या ‘सिंग इज ब्लिंग’चा ट्रेलर
अक्षय कुमारच्या 'सिंग इज ब्लिंग' या आगामी चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपट रसिकांवर चांगली छाप सोडली होती.

First published on: 19-08-2015 at 03:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumars singh is bliing trailer fails to impress watch it here