News Flash

रस्त्यावर भाजी विकतोय हा अभिनेता, अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये केले आहे काम

आर्थिक संकटामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. कलाविश्वाला देखील याचा मोठा फटका बसला आहे. नुकताच एक अभिनेता आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे भाजी विकत असल्याचे समोर आले आहे.

या अभिनेत्याचे नाव कार्तिक साहो असे आहे. तो ओडिशा येथे राहतो. वयाच्या १७व्या वर्षी कार्तिक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मायानगरी मुंबईमध्ये आला होता. तो अनेक वर्ष बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. त्याने अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडूलकरसारख्या अनेक स्टार्ससाठी बॉडीगार्ड म्हणून काम केले आहे.

आणखी वाचा : आर्थिक परिस्थितीमुळे ‘या’ अभिनेत्रीवर आली राख्या बनवून विकण्याची वेळ

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये कार्तिकने चित्रपटांमध्ये देखील छोट्या भूमिका साकारल्या असल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्याने अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात देखील एक फाइट सीक्वेंस केला असल्याचे म्हटले आहे. लॉकडाउन होण्यापूर्वी कार्तिक चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करुन जयपूरहून ओडिशाला घरी परतला. त्यानंतर त्याच्याकडे काम नव्हते.

काम मिळवण्यासाठी तो ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे गेला. तेथे त्याने भाजी विक्रिचा व्यवसाय सुरु केला. यातून मिळणाऱ्या पैशामधून तो घर चालवतो. ‘आता कुठे माझे करिअर सुरु झाले होते तर करोनामुळे लॉकडाउन सुरु झाला. पण मी हार मानलेली नाही. सर्व पुन्हा सुरळीत सुरु झाले की मी पुन्हा मुंबईमध्ये येईन आणि काम करेन’ असे त्याने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 4:31 pm

Web Title: akshay kumars sooryavanshi co star kartika sahoo sells vegetables in odisha to survive covid 19 pandemic avb 95
Next Stories
1 ऐश्वर्या व आराध्या बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
2 जवळ कोणीच नसतं, हात थरथरतात; बिग बींनी सांगितलं रुग्णालयातील भयाण वास्तव
3 पडत्या काळात गोविंदाकडे इंडस्ट्रीने दुर्लक्ष केलं- शत्रुघ्न सिन्हा
Just Now!
X