News Flash

अक्षय कुमारनं करून दाखवलं; जिथून हाकलण्यात आलं तिथंच घेतलं घर

पहिला पोर्टफोलिओ शूट करताना ही घटना घडली होती

अक्षय कुमार

बॉलिवूडमधील सर्वांचा लाडका अभिनेता अक्षय कुमार सध्या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता त्याची गणती करोडोंच्या यादीमधील अभिनेत्यांमध्ये केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का आज अक्षय राहत असलेल्या जुहू बंगल्यामधून त्याला ३३ वर्षांपूर्वी हकलण्यात आले होते.

३३ वर्षांपूर्वी अक्षय कुमारने करिअरला सुरुवात केली होती. तेव्हा तो एक स्ट्रगलिंग अभिनेता होता आणि त्याला एका पोर्टफोलिओची गरज होती. त्यामुळे त्याने त्या वेळी लोकप्रिय असलेला फोटोग्राफर जयेश शेठला पोर्टफोलिओ बनवण्यास सांगितले होते. पण जयेशला देण्यासाठी अक्षयकडे पुरेसे पैसे नव्हते. म्हणून अक्षयने जयेशकडे असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा : ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचं लग्न? जाणून घ्या सत्य

दोघांनी पोर्टफोलिओ शूट करण्यासाठी जुहूमधील एका बंगल्याची निवड केली. शूटच्या दिवशी दोघेही तेथे पोहोचले आणि शूट करु लागले. पोर्टफोलिओमधील एका फोटोसाठी अक्षय एका बंगल्याच्या भींतीवर चढला. तेवढ्यात त्या बंगल्याचा चौकीदार तेथे आला आणि त्याने अक्षय व जयेशला तेथून हकलवून लावले. नंतर ते दोघे ही तेथून निघून गेले.

आणखी वाचा : वीणाच्या वाढदिवशी शिवने दिले खास सरप्राईज

पण आश्चर्यची गोष्ट ही आहे की आज अक्षय त्याच बंगल्याचा मालक असल्याचा खुलासा जयेशने केला. ‘त्यावेळी रस्त्यावर शूट करणे ही नॉर्मल गोष्ट होती. म्हणून आम्ही एका जुन्या बंगल्याची निवड केली होती. अक्षय बंगल्याच्या भींतीवर चढला आणि पोज देऊ लागला. त्यावेळी तेथील चौकीदारने आम्हाला पाहिले. तो आम्हाला ओरडला आणि पोलिसांना फोन करेन अशी धमकी देऊ लागला. आम्ही तेथून पळून आलो’ असे जयेश म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 10:39 am

Web Title: akshay lives in the same bungalow from where he was thrown out 33 years ago avb 95
Next Stories
1 Holi 2020 : ‘या’ गाण्यांशिवाय होळीचा रंग आहे फिका!
2 पुरुषांनी महिलांची कामं करावीत, मगच त्यांना मानते – रविना टंडन
3 ‘हो, प्रसिद्धीसाठीच आरोप केले’; ब्रेकअपनंतर अभिनेत्रीची खासगी ऑडिओ क्लिप ‘लीक’
Just Now!
X