18 January 2019

News Flash

माझ्या बायकोला तर डॉक्टरही घाबरतात- अक्षय कुमार

अखेर डॉक्टर मला म्हणतात की, मित्रा तू एकटा येत जा कृपया बायकोला आणू नकोस', असे अक्षयने सांगितले.

अक्षय कुमार

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता लेखिका झाली आहे. ‘मिसेस फनी बोन्स’ या नावाने ट्विंकल ब्लॉग आणि लेखांद्वारे तिचे मत मांडते. तिचे ब्लॉग, लेख आणि तिने केलेले ट्विट अनेकदा चर्चेत असतात. ट्विंकलचे कोणतही वायफळ व्यक्तव्य मोठ्या चर्चेचं कारण होतं, असे खुद्द तिचा पती आणि अभिनेता अक्षय कुमारने म्हटले आहे. घरीसुद्धा मी तिच्या अशाच वक्तव्यांनी घेरलेला असतो. इतकेच नव्हे तर आमचे फॅमिली डॉक्टरही तिला असलेली माहिती आणि तिच्या ज्ञानामुळे घाबरतात, असेही अक्षय म्हणाला.

वाचा : नवीन वर्षात बॉबी देओलला लागला जॅकपॉट

पत्नी ट्विंकलविषयी अक्षय म्हणाला की, ‘ट्विंकलचे वक्तव्य नेहमी हेडलाइन होते. मग घरी काय परिस्थिती असेल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. घरी मी नेहमीच तिच्या वक्तव्यांनी घेरलेला असतो. पण त्यामुळे मला अनेकदा नवीन काहीतरी शिकायला मिळते. ती बराच अभ्यास करत असल्यामुळे तिला नवनवीन गोष्टींची माहिती असते.’

यावेळी अक्षयने ट्विंकलबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली. ‘आम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर ते आम्हाला काही सांगत असतानाच त्याविषयी ट्विंकल तिला असलेली माहिती देते. बऱ्याचदा तिच्या बोलण्याने डॉक्टरांनाही धक्का बसतो आणि ते चक्क तिला घाबरतात. अखेर डॉक्टर मला म्हणतात की, मित्रा तू एकटा येत जा कृपया बायकोला आणू नकोस’, असे अक्षयने सांगितले.

वाचा : …म्हणून २.० सिनेमा फ्लॉप होऊ शकतो

दरम्यान, आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून अक्षय काही दिवसांपूर्वी सुट्टीवर गेला होता. येत्या काळात तो ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

First Published on January 2, 2018 3:27 pm

Web Title: akshay reveals why doctors scared of twinkle khanna