25 September 2020

News Flash

‘जय हिंद जय भारत’ म्हणत टिक-टॉक स्टार अभिनेत्याने डिलिट केले चिनी अ‍ॅप

त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या मध्ये टिक-टॉक अ‍ॅपचा देखील समावेश आहे. सरकारच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक करत पाठिंबा दिला होता. या मध्ये सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. आता ‘धूम ३’ चित्रपटात काम करणारा अभिनेता सिद्धार्थ निगमने देखील मोबाईलमधील चिनी अ‍ॅप डिलिट केल्याचे सांगितले आहे.

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘माझ्या फोनमध्ये असणारे सगळे चिनी अ‍ॅप डिलिट केले. टिक-टॉक, व्ही चॅट, शेअर इट. जय हिंद जय भारत’ असे त्याने म्हटले आहे.

सिद्धार्थ देखील एक टिक-टॉक स्टार आहे. त्याचे टिक-टॉकवर लाखो फॉलोअर्स होते. तसेच त्याच्या व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीला देखील उतरत होते.

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 3:50 pm

Web Title: aladdin actor siddharth nigam deletes all the chinese apps avb 95
Next Stories
1 Video : अभिषेकच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा ट्रेलर प्रदर्शित
2 कमाल झाली… पाणी कसं प्यावं हे सांगणाऱ्या मलायकाच्या ‘या’ व्हिडिओला आठ लाख व्ह्यूज
3 अभिनयानंतर विवेक ओबेरॉयची निर्मिती क्षेत्राकडे वाटचाल; ‘या’ चित्रपटापासून करणार श्रीगणेशा!
Just Now!
X