बॉलिवूड सिनेसृष्टीवर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. ही इंडस्ट्री सेलिब्रिटी किड्सला पहिलं प्राध्यान्य देते, असं म्हटलं जात परंतु या गटबाजीच्या वातावरणातही काही कलाकार फिल्मी बॅकग्राऊंड नसाताही स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करतात. अली फजल हा अशाच महत्वाकांक्षी कलाकारांपैकी एक आहे. प्रचंड संघर्ष करुन त्याने या झगमगत्या दुनियेत स्वत: स्थान निर्माण केलं.

अवश्य पाहा – बिग बी-नागराज यांच्या ‘झुंड’चे प्रदर्शन अडचणीत; सर्वोच्च न्यायालयानेच घातली बंदी

अली करिअरच्या सुरुवातीस कॉल सेंटरमध्ये नोकरी करायचा. त्यावेळी तो १९ वर्षांचा होता. त्याला केवळ आठ हजार रुपये पगार मिळायचा. त्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे कॉलेजची फी भरण्यासाठी तो नोकरी करायचा. अलीने एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ही दोस्ती तुटायची नाय; ‘ग्रॅव्हिटी’ सुपरहिट होताच अभिनेत्याने मित्रांमध्ये वाटले ७४ कोटी

अवश्य पाहा – करिना कपूरच्या भावासोबत तारा करतेय रोमान्स; मालदीवमधील फोटो व्हायरल…

अली फजल आज बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. २००८ साली ‘द अदर एंड ऑफ द लायन’ या शॉटफिल्ममधून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘थ्री इडियट्स’, ‘फुकरे’, ‘सोनाली केबल’, ‘हाऊस अरेस्ट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तो झळकला. ‘फास्ट अँड फ्युरिअस’ या हॉलिवूड चित्रपटामध्ये देखील त्याने एक लहानशी भूमिका साकारली होती. ‘मिर्झापुर’ या वेब सीरिजमुळे सध्या तो प्रचंड चर्चेत आहे.