09 March 2021

News Flash

नवाजुद्दीनच्या पत्नीला हवी पोटगी; आलियाने केली तब्बल ३० कोटींची मागणी

१० वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे

नवाजुद्दीन सिद्दिकी व त्याची पत्नी आलिया सिद्दिकी

गेल्या काही दिवसापासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं वैयक्तिक आयुष्य चर्चिलं जात आहे. नवाजुद्दीनच्या पत्नीने आलियाने इमेलद्वारे नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठविली आहे. १० वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर वैवाहित जीवनातील चढाओढींमुळे तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आलियाने घेतलेल्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर सध्या नवाजुद्दीन आणि आलियाचीच चर्चा सुरु असून आता आलियाने घटस्फोट घेण्यापूर्वी काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. यात तिने पोटगीमध्ये भलीमोठी रक्कम मागितल्याचंही दिसून येत आहे.

‘स्पॉटबॉय’नुसार, आलियाने नवाजुद्दीनकडे दोन्ही मुलांचा ताबा आणि भलीमोठी रक्कम पोटगी म्हणून मागितली आहे. आलियाने नवाजुद्दीनला पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत समोर आली असून यात तिने काही मागण्या केल्याचं दिसून येत आहे.

आलियाने पोटगी म्हणून नवाजुद्दीनकडे तीस कोटी रुपये, यारी रोड येथे ४ बीएचके फ्लॅट आणि कायमस्वरुपी स्वत:च्या आणि मुलांच्या खर्चासाठी १० कोटी रुपये मागितले आहेत. तसंच मुलांच्या संगोपनासाठी १०-१० कोटी रुपये फिक्स डिपॉझिट करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे नवाजुद्दीनने देखील तिच्या या अटी मान्य केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच आलियाने ट्विटरवर पदार्पण केलं असून तिने तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या संसाराला १० वर्ष झाली असून त्यांना दोन मुलं आहेत. लग्नाला एक वर्ष झालं, तेव्हापासूनच वैवाहिक जीवनात चढउतार सुरू झाल्याचं आलियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आलियाने घटस्फोटाची नोटीस पाठवल्यावर अद्याप नवाजुद्दीनने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. लॉकडाउन असल्यामुळे इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे नोटीस पाठवल्याचं आलियाच्या वकिलांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 9:54 am

Web Title: alia asks nawazuddin siddiqui for 30 crore alimony and 4 bhk flat ssj 93
Next Stories
1 बाळाचं नाव ‘सोनू सूद श्रीवास्तव’; मदत करणाऱ्या सोनूला बिहारमधील कुटुंबाचा अनोखा सलाम
2 अक्षय कुमार मदतीसाठी पुन्हा सज्ज; ‘या’ क्षेत्रातील मजुरांना केली आर्थिक मदत
3 VIDEO : नाचणाऱ्या साराला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे
Just Now!
X