27 February 2021

News Flash

‘काकांच्या निधनाला आठवडाही झाला नाही आणि…’, रणबीर-आलिया झाले ट्रोल

सध्या त्यांचा रणधीर कपूर यांच्या पार्टीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

(Photo credit : Viral bhayani instagram Video)

सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. व्हिडीओमध्ये रणबीर आणि आलिया रात्री १ वाजता पार्टी अटेंड करुन बाहेर पडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आज रणधीर कपूर यांचा ७४वा वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी काल रात्री १२ वाजता संपूर्ण कपूर कुटुंबीय एकत्र जमले होते. त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी तेथे रणबीर आणि आलिया देखील उपस्थित होते. रणधीर कपूर यांचा छोटा भाऊ आणि रणबीर कपूरचे काका राजीव कपूर यांचे पाच दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. असे असताना देखील कपूर कुटुंबीयांनी पार्टीचे आयोजन केल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. त्यांनी आलिया आणि रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका यूजरने, ‘धक्कादायक, राजीव कपूर यांच्या निधनाला एक आठवडाही झाला नाही आणि हे लोकं पार्टी एन्जॉय करतायेत’ असे कमेंट करत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने किती स्वार्थी आणि निर्दयी आहेत हे लोकं अशी कमेंट केली आहे.

रणधीर कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेल्या पार्टीला आलिया भट्ट, रणबीर कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, नीतू कपूर, तारा सुतारिया, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, संजय कपूर यांनी हजेरी लावली असल्याचे म्हटले जाते.

९ फेब्रुवारी रोजी राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. रणबीर कपूर काका राजीव कपूर यांच्या अगदी जवळचा असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 1:51 pm

Web Title: alia bhatt and ranbir kapoor celebrated randhir kapoor birthday video viral and get troll avb 95
Next Stories
1 नया है यह…पुन्हा एकदा ‘टाईमपास’?
2 ‘हिरकणी’ नंतर ‘छत्रपती ताराराणी’; सोनाली कुलकर्णीचा नवा सिनेमा
3 ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या दिवशी सुनील ग्रोव्हरने विकले छोले-कुल्छे, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X