News Flash

Photo : रणबीर-आलियाचं ‘सेल्फी’ प्रेम

रणबीर आणि आलिया येत्या जूनपर्यंत साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर रणबीर-आलियाचा सेल्फी

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’, सध्या ही ओळ बी-टाऊनच्या एका जोडीला तंतोतत जुळते. ही जोडी म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. प्रसारमाध्यमांसमोर प्रेमाची कबुली दिल्यानंतर रणबीर-आलियाने सोशल मीडियावर खुलेप्रमाणे प्रेम व्यक्त केलं आहे. आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. त्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या सोशल मीडियावर रणबीर-आलियाचा एक सेल्फी चांगलाच व्हायरल होत आहे.

‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरील या सेल्फीमध्ये रणबीर आणि आलियासोबत आणखी एक व्यक्ती पाहायला मिळत आहे. याआधीही दोघांचे सेटवरील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रणबीरसोबतच त्यांच्या कुटुंबीयांशीही आलियाची जवळीक वाढली आहे. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आलियाने रणबीरच्या कुटुंबीयांसोबत केलं होतं.

ranbir alia ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर-आलियाचा सेल्फी

रणबीर आणि आलिया येत्या जूनपर्यंत साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांनी ‘ब्रह्मास्त्र’ प्रदर्शित होण्याआधी साखरपुडा करावा अशी इच्छा रणबीरची आई नीतू कपूर यांनी व्यक्त केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ ऑगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी या दोघांनी साखरपुडा करावा अशी कपूर कुटुंबीयांची इच्छा आहे. रणबीर आणि आलियाचं नातं कपूर कुटुंबीयांना देखील मान्य आहे.

२०१८ पासून रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 3:35 pm

Web Title: alia bhatt and ranbir kapoor shares a selfie from the sets of brahmastra
Next Stories
1 Video : ब्रेकअपचं दु:ख पचवून नेहाचं मुव्ह ऑन, ‘सिम्बा’मधील गाण्यावर धरला ठेका
2 भाई व्यक्ती की वल्ली या सिनेमावरची चर्चा भरकटते आहे- गणेश मतकरी
3 Photo : अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर यांचा ‘टोटल धमाल’
Just Now!
X