नवीन वर्षाचं स्वागत एकत्र करण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर कुटुंबीयांसोबत राजस्थानला गेले. या सेलिब्रेशनमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनीसुद्धा त्यांना साथ दिली आहे. नीतू कपूर यांनी इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो शेअर केला आणि त्यावरून हे सर्वजण एकत्र असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे रणथंबोरमध्ये रणबीर-आलिया गुपचूप साखरपुडा करणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, कुटुंबीय आणि रणवीर-दीपिकाच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडणार असल्याचं समजतंय. इतकंच नव्हे तर आलियाचा मार्गदर्शक व निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसुद्धा राजस्थानसाठी रवाना होणार असल्याचं कळतंय. हे सर्वजण रणथंबोरमधल्या अमान हॉटेलमध्ये थांबणार आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हे सर्व याठिकाणी पोहोचल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र आता रणबीर-आलियाच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
आणखी वाचा- … तर आतापर्यंत आलियाशी लग्न केलं असतं- रणबीर कपूर
काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने स्पष्ट केलं होतं, की करोनाचा प्रादुर्भाव नसता तर या वर्षात त्याने आलियाशी लग्न केलं असतं. करोनामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलल्याचं त्याने सांगितलं. त्यासोबतच ही गोष्ट लवकरच घडणार असल्याचंही त्याने म्हटलं होतं.