News Flash

कंगनासारखं बोलणं मला जमत नाही, आलियाचा पलटवार

कंगनानं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला बेजबाबदार म्हटलं होतं.

कंगना रणौत हिनं पुन्हा एकदा आपला मोर्चा अभिनेत्री आलिया भट्टकडे वळवला आहे. ‘मणिकर्णिका’चं यश साजरं करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पार्टीत कंगनानं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला बेजबाबदार म्हटलं होतं. कंगनाच्या या टीकेला आलियानं पुन्हा एकदा तितक्याच संयमानं उत्तर दिलं आहे.

‘कंगनासारखं बेधडक बोलणं मला जमत नाही. तिच्या जागी ती योग्य असल्याचं मला वाटते. कधी कधी आम्ही कलाकार माघार घेतो. उगाच का बोलावं असं आम्हाला वाटतं. मला मतं आहेत मात्र ती मी माझ्यापुरताच ठेवते. पण कंगना उत्तमपणे आपलं मत मांडते.’ असं उत्तर आलियानं दिलं आहे.

आलिया रणबीर सारखे कलाकार राजकारणावर बोलणं टाळतात असा आरोप कंगनानं केलं होता. आलियानं कंगनानं केलेल्या आरोपावर संयमानं उत्तर दिलं आहे. याआधीही कंगनानं आलियावर टीकेची तोफ डागली होती. आलियासारख्या कलाकारांना स्वत:ची मत नाहीत ती करण जोहरच्या हातची कठपुतळी आहे असं कंगना म्हणाली. कंगानाच्या या आरोपांवर आलियानं जाहीरपणे बोलणं टाळलं होतं तिला मी स्वत: भेटून यावर उत्तर देईन असं ती म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 10:23 am

Web Title: alia bhatt on kangana ranaut slamming her for not speaking up
Next Stories
1 Photo : कर्करोगावर मात केल्यानंतर सोनालीचे फोटोशूट, दाखवला २० इंचाचा कट
2 राहुल वैद्य आणि केतकी माटेगावकर का म्हणत आहेत ‘साथ दे तू मला’?
3 एप्रिल किंवा मे महिन्यात फरहान-शिबानी बांधणार लग्नगाठ
Just Now!
X