23 November 2020

News Flash

‘प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण…’, आलिया भट्टची पोस्ट व्हायरल

तिला या पोस्टमुळे देखील ट्रोल करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. अनेकांनी सुशांतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले होते. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी बॉलिवूडमधील स्टार किड्सला ट्रोल करण्यास सुरुवात केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष करुन आलिया भट्ट आणि तिच्या कुटुंबीयांवर टीका केली जात होती. त्यामुळे ट्रोलिंगला कंटाळून आलियाने तिचा कमेंट बॉक्स लिमिटेड केला होता. पण आता आलियाने सोशल मीडियावर पोस्ट करताच तिला पुन्हा ट्रोल केले जात आहे.

आलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती या सिंपल लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. पण नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी तिचा हा लूक आवडला आहे.

हा फोटो शेअर करत आलियाने अमेरिकन कवि maya Angelou यांचा कोट शेअर केला आहे. ‘कधी कधी ज्या गोष्टी घडत असतात त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण या सर्वामुळे तुम्ही स्वत:ला कमी लेखू नका’ या आशयाची पोस्ट तिने केली आहे.

आलियाचा या पोस्टरवर एका यूजरने कमेंट करत ‘सडक २चा इफेक्ट’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने सडक २चे डिसलाइक पाहिले का? असे म्हटले आहे.

आलियाच्या ‘सडक २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच पहिल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक डिसलाइक मिळालेला ट्रेलर ठरला होता. त्यामुळे आता चाहत्यांनी आलियाच्या पोस्टवर कमेंट करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 6:15 pm

Web Title: alia bhatt share posts on intagram and get trolled avb 95
Next Stories
1 प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने ठोठावलेल्या दंडावर प्रकाश राज यांनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले…
2 सलमान खानने शब्द पाळला; पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या उभारणीला सुरुवात
3 “एक रुपया दाम लगाया बंदे का, वो भी…”
Just Now!
X