बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे अल्का याज्ञिक. आज २० मार्च रोजी त्यांचा ५५ वाढदिवस आहे. ‘प्यार की झंकार’ आणि ‘मेरे अंगने में’ या गाण्यांनी करिअरची सुरुवात करणाऱ्या अल्का आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका म्हणून ओळखल्या जातात.

वयाच्या १४व्या वर्षा अल्का यांनी म्यूझिक इंडस्ट्रीमधील करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी आजवर २ हजार पेक्षा अधिक गाणी गायिली आहेत. तसेच त्यांनी १६ भाषांमध्ये गाणी गात अनेकांची मने जिंकली आहेत. अल्का त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्यामुळे त्या चर्चेत होत्या. त्यांनी १९८९ साली शिलाँगमधील उद्योगपती नीरज कपूरशी लग्न केले होते. लग्नानंतर जवळपास २७ वर्षांपेक्षा अधिक काळ ते ऐकमेकांपासून लांब राहिले होते.

नीरज यांचा पूर्ण बिझनेस शिलाँगमध्ये होता आणि अल्का या मुंबईत राहून काम करु इच्छित होत्या. त्यामुळे त्यांना एकमेकांपासून लांब रहावे लागत होते. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नीरज हे मुंबईत यायचे. एका मुलाखतीमध्ये अल्का यांनी याबाबत वक्तव्य केले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, ‘नीरज मुंबईमध्ये त्याचा बिझनेस सुरु करत होता. पण तो एका छोट्या शहरातून आहे आणि त्याला मुंबईमध्ये बिझनेस करणे थोडे कठिण झाले होते. इथे बिझनेस सुरु केल्यानंतर त्याचा बराच तोडा झाला. त्यामुळे मी त्याला शिलाँगमध्येच बिझनेस कर असे म्हटले.’