दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आणि त्याची दोन्ही मुले सतत चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून या कुटुंबामध्ये वाद सुरु असल्याचे म्हटले जात आहे. या चर्चा नागार्जुनच्या कुटुंबीयांनी एकत्र फॅमिली फोटो किंवा त्यांचे गेट-टूगेदर न झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. तसेच नागार्जुनचा मुलगा अखिल याच्या वाढदिवशी नागा चैतन्यने त्याला शुभेच्छा न दिल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
नुकताच अखिल अक्किनेनीने त्याचा २६वा वाढदिवस साजरा केला. चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण अखिलचा भाऊ नागा चैतन्य आणि त्याची पत्नी समांथा अक्किनेनीने अखिलला शुभेच्छा देण्यासाठी कोणतीही सोशल मीडिया पोस्ट केली नव्हती. त्यामुळे अक्किनेनी कुटुंबीयांमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. पण अद्याप अक्किनेनी कुटुंबाने याबाबत कोणती माहिती दिलेली नाही. खासकरुन अखिल आणि नागा चैतन्यमध्ये वाद सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या समांथाकडे दोन तमिळ चित्रपट आहेत. एका चित्रपटात ती विजय सेतुपति आणि नयनतारा यांच्यासोबत दिसणार आहे. तर समांथाचा दुसरा चित्रपट एक हॉरर थ्रिलर आहे. तसेच नागा चैतन्य देखील लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. त्यात अभिनेत्री साइ पल्लवी देखील असणार आहे.