News Flash

oscars 2021 : ऑस्करच्या शर्यतीमधून ‘जलिकट्टू’ बाहेर

दक्षिण भारतात खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टू या खेळावर आधारित हा चित्रपट आहे

चित्रपट समिक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा ‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. या पुरस्कार स्पर्धेसाठी देशभरातील २७ चित्रपटांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ‘जलिकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला होता. मात्र, आता या शर्यतीतून त्याला बाहेर पडावं लागलं आहे.

यंदा ऑस्करचा ९३ वा पुरस्कार सोहळा रंगणार असून ‘जलिकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला होता. फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी हा चित्रपट प्रयत्न करत होता. मात्र, आता त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. या चित्रपटाची कथा दक्षिण भारतात खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टू या खेळावर आधारित आहे.

आणखी वाचा- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कानभट’चा दबदबा

‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑक्टोंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात Antony Varghese, Chemban Vinod Jose, Santhy Balachandran, Jaffar Idukki यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. जबरदस्त पटकथा आणि अभिनय यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि युरोपमध्ये इंग्रजी भाषांतर करुन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लक्षवेधी बाब म्हणजे अनेक पाश्चात्य समिक्षकांनीही या चित्रपटाची प्रचंड स्तुती केली होती. परिणामी ‘फिल्म फेडरोशन ऑफ इंडिया’नं ऑस्कर स्पर्धेसाठी या ‘जलिकट्टू’ची निवड केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 11:36 am

Web Title: allikattu out of oscars 2021 race in best international feature film category ssj 93
Next Stories
1 मी टॉम क्रुजपेक्षा चांगले अ‍ॅक्शन स्टंट करु शकते, कंगनाचे ट्विट चर्चेत
2 अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
3 लॉकडाउनमध्ये पॉर्न फिल्मसची मागणी वाढली म्हणून…पॉर्न रॅकेट प्रकरणात धक्कादायक खुलासा
Just Now!
X