झीयुवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. मालिकेतील नचिकेत आणि सई या महत्वाच्या व्यक्तिरेखांसोबतच अप्पा केतकर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी उचलून धरली आहे. शिस्तप्रिय, प्रामाणिक पण तेवढेच प्रेमळ असे अप्पा या मालिकेचा जणू प्राण बनलेत. अशा या लाडक्या आणि आदरणीय अप्पांचा ७५ वा वाढदिवस आहे.
तिथीनूसार आप्पांचा वाढदिवस आहे आणि त्याचं सेलिब्रेशन लवकरच तुम्हाला या मालिकेमध्ये पहायला मिळणार आहे. अप्पांचा तिथीनूसार ७५ वा वाढदिवस येतोय म्हणून नचिकेत खास तयारीला जुंपलाय. त्याने अप्पांची आवडती ७५ पुस्तकं आणलीयेत आणि ती अनाथ आश्रमाला भेट द्यायचे त्याने ठरवले आहे. शिवाय अप्पांना झाडांची आव़ड असल्याने त्याने ७५ वेगवेगळी रोपं आणून ठेवली आहेत. यातलं एक कलम त्याने त्यांच्या घराच्याबाहेर लावलंय तर उरलेली ७४ रोपं सोसायटीच्या परिसरात लावण्याचात्याचा प्लॅन आहे.
एकूणच अप्पांचा वाढदिवस त्यांच्याआवडीनूसार आणि कलेनूसार साजरा करण्याची पुर्ण योजना नचिकेतने बनवलीये.पणअप्पांसाठी बनवलेली नचिकेतची कुठलीही योजना अडथळ्याशिवाय पुर्णहोईल इतकं सोप्पं थोडीच असणारे यातही ट्विस्ट येणारच. ते काय असेल ते मात्र तुम्हाला येणाऱ्याभागांमध्ये दिसेलच. तेव्हा पहायला विसरु नका ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण रोज रात्री ८ वाजता फक्त झी युवा वाहिनीवर.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 17, 2020 4:30 pm