News Flash

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’च्या कलाकारांसाठी नवे आव्हान!

जाणून घ्या सविस्तर...

सर्व नियम आणि अटींचे पालन करून जवळपास ३ महिन्यांच्या मोठ्या ब्रेकनंतर मालिकांच्या सेटवर शूटिंगची लगबग सुरु झाली. बघता बघता सर्व मालिकांचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. झी युवावरील लोकप्रिय मालिका ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’चे नवीन भाग १३ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेचे कलाकार आणि संपूर्ण टीम सेटवर पूर्ण खबरदारी घेऊन नियमांच्या चौकटीत राहून चित्रीकरण करत आहेत. तसेच कमी लोकांसोबत योग्य ती सावधानता बाळगत मालिकेचे शूटिंग होतय. परंतु अनलॉकनंतर शूटिंग करताना या सेटवर कलाकारांना सर्वात मोठा बदल स्वीकारावा लागला आहे.

हा बदल म्हणजे मेकअप आर्टिस्ट्सची अनुपस्थिती. हो हे खरंय! ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’च्या सेटवर सर्व कलाकार स्वतःचा मेकअप स्वतः करत आहेत. हे खरतर कलाकारांसाठी एक आव्हानच म्हणावे लागेल. पण स्वतःचा मेकअप स्वतः करताना सेटवरील सर्व कलाकारांची काय तारांबळ उडते हे अभिनेत्री गौरी कुलकर्णीने सांगितले आहे.

“३ महिन्यांनंतर ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचे शूट सुरु झालय आणि हे शूटिंग करताना आम्ही खूप काळजी घेतोय. त्यामुळे सध्या आम्ही स्वतःचा मेकअप स्वतः करतोय. आम्हाला सांगण्यात आले होते की सगळ्यांना स्वतःचा मेकअप स्वतः करावा लागेल. रेग्युलर मेकअप आणि स्क्रिनवरती दिसण्यासाठी करण्यात येणारा मेकअप यात खूप फरक असतो. त्यामुळे आम्हाला हा मेकअप  करण्याचा फारसा अनुभव नव्हता. शूटिंगचे पहिले दोन दिवस मेकअप आणि हेअर आर्टिस्ट्सनी येऊन आम्हाला गाईड केले’ असे ती म्हणाली.

‘मेकअप आर्टिस्टने आम्हाला आमच्या स्किनटोननुसार कुठले मेकअपचे शेड्स वापरायचे ते सांगितले. प्रत्येकाला वेगवेगळे मेकअपचे साहित्य दिले. मी माझ्या घरुन माझे बहुतेक मेकअपचे सामान आणले आहे. त्यामुळे मी माझा मेकअप करताना माझेच सामान वापरतेय. हा एक खूप छान आणि वेगळा अनुभव आहे. सुरुवातीला खूप अवघड गेले करण सवय नव्हती. मला मेकअप मधल काहीच येत नव्हत, पण आता मला हळूहळू बऱ्यापैकी मेकअप जमतेय’ असे ती पुढे म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 6:00 pm

Web Title: almost sufal sampurnam serial actors doing their makeup on their own avb 95
Next Stories
1 Video : “दिल बेचारा” म्यूझिक ट्रॅक व्हिडीओद्वारे ए आर रहमानने वाहिली सुशांतला श्रद्धांजली
2 सलमान खान करतोय ‘वर्क फ्रॉम होम’; ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यास दिला नकार
3 थलायवाने आलिशान लॅम्बॉर्गिनी चालवली, सोशल मीडियावर चाहते सुसाट
Just Now!
X