छोट्या पडद्यालवरील ‘अलमोस्ट सुफल संपुर्ण’ या मालिकेने नुकताच २५० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला. एकीकडे नचिकेत आणि सई यांच्यातलं हळूवार फुलणारं प्रेम आणि दुसरीकडे अप्पांचा फॉरेन रिटर्न नचिकेतला असलेला विरोध. अप्पा आणि नचिकेतमधल्या नात्यांचे हे चढ उतार पाहण्यामध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतले आहेत. आता मालिकेत एक नवी एण्ट्री होणार आहे.

अगदी थोड्याशा अवधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे. पण आता मालिकेमध्ये एक नवे वळण येणारे आणि हे वळण येतेय एका नवीन व्यक्तिरेखेच्या प्रवेशातनं. ‘साजणा’ फेम अभिनेत्री पूजा बिरारी ही मालिकेत नवी व्यक्तिरेखा साकारणार आहे.

आणखी वाचा : “कोणी घर देतं का घर?” का म्हणते अभिनेत्री पूजा बिरारी

पूजाने मालिकेतल्या तिच्या या व्यक्तिरेखेसाठीचे शुटिंग सुरुही केले. पूजा यात नचिकेतच्या ऑस्ट्रेलियातल्या मैत्रिणीची भूमिका साकारणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये रहातअसल्याने ती खुप मॉडर्न आहे. शिवाय ती नचिकेतची खास मैत्रिण असल्यामुळेती नचिकेतच्या सर्व सवयी, त्याचा स्वभाव जाणते. आता नचिकेतला भेटण्यासाठी ती भारतात आलीये आणि कुठे तरी तिच्या येण्याने सई चांगलीच अस्वस्थ झालीये.

सईचीही अस्वस्थता पुढे काय रुप घेणार? नचिकेत आणि सई कायमचे एकत्र येणार का? पूजा या दोघांच्या प्रेमामध्येयेणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांनाही मालिका पहाताना पडणारेत ज्याची उत्तरं अर्थातच हळूहळू मालिकेच्याआगामी भागात उलगडतील.