बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता पाच आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी प्रत्येक स्पर्धक शोमध्ये टिकून राहण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान कविता कौशिक आणि अली गोनी या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु आहे. अलीने तर तुला सुखानं जगू देणार नाही अशी थेट धमकीच कविताला दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors TV (@colorstv)

कविता सध्या बिग बॉसच्या घरात कॅप्टन आहे. नियमाप्रमाणे घरातील प्रत्येक सदस्याला कॅप्टनचे आदेश मानावे लागतात. परंतु कविताचे आदेश मानण्यास अलीने साफ नकार देत आहे. कविता घरातील सर्वांना त्यांची काम वाटून देत आहे. परंतु अलीने मात्र कविताने सांगितलेले काम करण्यास नकार दिला. परिणामी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. दरम्यान अलीने तुला या घरात सुखाने जगू देणार नाही अशी धमकीच कविताला दिली. या संपूर्ण भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. या लढाईत काही जणांनी कविताला पाठिंबा दिला आहे तर काहींनी अलीला.