तुम्हाला कधी शाळेत जायला उशीर झाला होता का? अर्थाथच आपल्यापैकी प्रत्येकाला शाळेत पोहचण्यासाठी कधी ना कधी उशीर झाला होता त्यावेळी आपल्या उशीरा येण्याची शिक्षा मिळाली असणार पण तुमच्या शिक्षकांना कधी उशीर झाला होता का? शिक्षिकांना उशीर झाला तर त्यांना काय शिक्षा होत असेल? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षिकांनाही अनेकदा प्राचार्यांचा ओरडा खावा लागतो. सध्या अशाच शाळेत उशीरा येण्यावरून शिक्षिका आणि प्राचार्यामध्ये वाद पेटला आहे. हा वाद इतका टोकाला पोहचला की, दोघींमध्ये मारामारी सुरु झाली. दरम्यान या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. आग्रा येथील एका खेडेगावातील या प्राथमिक शाळेतील हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – उन्हापासून वाचण्याचा हटके जुगाड, ट्रॅफिक सिग्नलवर….; Viral Video पाहून पुणेकर म्हणे,”आम्हालाही ही सुविधा द्या”

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दोन महिला – एक शिक्षिका आणि शाळेच्या प्राचार्या यांच्यामध्ये मारामारी करताना दिसत आगहे. या वादाचा कारण काय तर शिक्षिकेला शाळेत यायला उशीर झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये, दोन महिला हाताने मारामारी करताना दिसत आहे. भांडताना एकमेकींच्या अंगावरील कपडे जवळपास फाडून टाकतात. दरम्यान त्या शिष्टाचाराबद्दलही ओरडत आहेत. दुसरा कर्मचारी सदस्य भांडणात मध्ये पडतो आणि दोन महिलांना वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. एक महिला दरवाज्याच्या दिशेने जात असताना दुसरी पुन्हा तिला मारायला जाते. दुसरा कर्मचारी दोघींना अडवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.”

एका X वापरकर्त्याने @harikantsharmaG प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे की, शाळेत उशिरा आल्याने महिला शिक्षिका आणि शाळेच्या मुख्याध्यापकात भांडण झाले.व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सिकंदरा पोलीस स्टेशन हद्दीतील सीगाणा गावातील पूर्व माध्यमिक शाळेचे प्रकरण. महिला शिक्षिका जखमी, खुद्द मुख्याध्यापिकेनेच शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. #आग्रा @agrapolice

हेही वाचा – १९९१ मधील चांदणी चौकचा Viral Video पाहून पुणेकरांच्या आठवणी झाल्या जाग्या, म्हणे, “हरवलं सगळं ते आता”

इन्स्टाग्रामवर, @jistnews ने व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Viral Vadapav Girl चंद्रिका दीक्षितला दिल्ली पोलिसांनी केली अटक? व्हायरल व्हिडीओमध्ये केला दावा, जाणून घ्या सविस्तर…

व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने म्हटले, “आणि त्यांची पात्रता, आता न्याय्य आहे!” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “अनेक मुलांचे स्वप्न येथे पूर्ण होत आहे…” तिसऱ्या वापरकर्त्याने पुढे म्हटले, “शिक्षक त्यांचे अतिरिक्त कौशल्य दाखवत आहेत.”