News Flash

Video : बहुचर्चित ‘बंदिश बॅडिट्स’चा ट्रेलर प्रदर्शित

नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकेत

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या ‘बंदिश बॅडिट्स’ या सीरिजचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसापासून या सीरिजची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु असून अखेर त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजमधून एक प्रेमकथा उलगडली जाणार आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणारी ही सीरिज म्युझिकल ड्रामा प्रकारात मोडणारी आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा टीजर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ट्रेलर आल्यामुळे या सीरिजविषयी प्रेक्षकांची असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा ट्रेलर अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दहा भागांच्या या सीरिजमध्ये एक पॉप गायिका आणि संगीत क्षेत्रात आपल्या आजोबांचा पावलावर पाऊल ठेवत नावलौकिक मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गायकाची प्रेमकथा उलगडण्यात येणार आहे. प्रेम म्हटलं की त्यात विरह हा आलाच. परंतु, विरहानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येते की नाही हे सीरिज पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना कळणार आहे.

दरम्यान, या सीरीजमध्ये अभिनेता रितिक भौमिक आणि अभिनेत्री श्रेया चौधरी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.त्यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, कुणाल रॉय कपूर, शीबा चड्ढा आणि राजेश तैलंग ही दिग्गज कलाकार मंडळीही झळकणार आहे. ‘बंदिश बॅडिट्स’ ही सीरिज ४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 3:58 pm

Web Title: amazon prime video new show bandish bandits trailer release ssj 93
Next Stories
1 विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान
2 “दुबई में दुबके महाशय”, अनुराग कश्यपने केआरकेला सुनावले
3 ‘करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजताच…’; ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्रीने सांगितला अनुभव
Just Now!
X