‘एफएक्स’ वाहिनीवर ‘अमेरिकन क्राइम स्टोरी’चा तिसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या तिसऱ्या सिझनमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व मोनिका लेविंस्की यांचे प्रेमप्रकरण दाखवण्यात येणार आहे. ही सीरिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी प्रदर्शित होणार असल्याने एकेकाळी तिथल्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या या सेक्स स्कँडलची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.

विशेष म्हणजे मोनिका या सीरिजची निर्माती आहे. २७ सप्टेंबर २०२० म्हणजेच निवडणुकांच्या जवळपास पाच आठवड्यांपूर्वी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. “मी स्क्रिप्ट वाचली असून मला ती फार आवडली आहे. माझ्या मते अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष कोण होणार यावर सीरिजचा काही परिणाम होणार नाही,” असं एफएक्स नेटवर्क्सचे सीईओ जॉन लँडग्राफ म्हणाले.

President Muizzu party secures big win in Maldive
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष विजयाच्या समीप; चीनधार्जिण्या मोइझ्झू यांच्या पक्षाला ‘मजलिस’मध्ये सर्वाधिक जागा
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”

१९९८ चे सेक्स स्कँडल आहे तरी काय?

१९९८ मध्ये अमरेकिचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेविंस्की यांच्यातली सेक्स स्कँडलने अमेरिकेत वादळ आले होते. मोनिका व्हाईट हाऊसमध्ये इंटर्न म्हणून काम करत होती. मोनिका त्यावेळी २२ वर्षांची होती. तिने प्रसारमाध्यमांमध्ये हा खुलासा केला होता की बिल क्लिंटन आणि माझ्यात १९९५ ते १९९७ या काळात लैंगिक संबंध होते. हे संबंध दोघांच्याही सहमतीने प्रस्थापित झाले होते. मात्र मोनिका लेविंस्कीने बिल क्लिंटन यांच्यावर गैरफायदा घेतल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला क्लिंटन यांनी मोनिकाचे आरोप फेटाळले. तसेच कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र काही काळानंतर लैंगिक संबंध असल्याची बाब त्यांनी कबूल केली. या सगळ्या घडामोडींमुळे क्लिंटन यांच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच हे संपूर्ण प्रकरण जगभरात गाजले होते. बिल क्लिंटन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावही आणला गेला होता. मात्र काही काळाने त्यांना या आरोपांतून मुक्त करण्यात आले.