08 March 2021

News Flash

आमिर खानचा बहुचर्चित चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आधी हा चित्रपट २०२० मध्ये नाताळला प्रदर्शित होणार होता. पण आता प्रदर्शनाची तारीक बदलण्यात आली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत असणारा लालसिंग चड्ढा हा चित्रपट २०२१मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वेत चंदन करत आहेत’ असे त्यांनी म्हटले आहे.

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच करीना कपूर देखील या चित्रपटात पंजाबी मुलीची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच करीनाचा चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 4:19 pm

Web Title: amir khan kareena laal singh chaddha new release date avb 95
Next Stories
1 कंगनाने आयुषमानवर निशाणा साधताच नेटकरी संतापले, म्हणाले…
2 मृण्मयी रमली ‘केसर’च्याआठवणीत
3 सुशांत मृत्यू प्रकरण: संजय राऊत यांच्यावर सुशांतचं कुटुंब ठोकणार मानहानीचा दावा
Just Now!
X