News Flash

पत्रकरांवर भडकली अमिषा पटेल, म्हणते मला ‘अमिषाजी’ म्हणा..

एकेरी उल्लेख केल्यामुळे अमिषाला आला राग

अमिषा पटेल तिच्या आगामी चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत आलेल्या पत्रकारांवर भडकली. म्हणावे तसे कारण गंभीर नव्हते पण गोष्ट जेव्हा मानापमानाची येते तेव्हा त्याला कोण काय करणार. परिषदेत आलेल्या  पत्रकारांनी तिच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रश्न विचारायला सुरूवात केली, मात्र हे प्रश्न विचारताना ‘अमिषा’ असा तिचा एकेरी उल्लेख पत्रकारांनी केला. पत्रकरांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली परंतु पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना तिचा आक्षेप नव्हता तर आपल्या नावाचा एकेरी उल्लेख केला म्हणून तिला राग आला. मला अमिषा म्हणण्याऐवजी ‘अमिषाजी’ म्हणा असेही तिने पत्रकारांना सांगितले.  इतकेच नाही तर सुरूवातीला काही पत्रकार बोलत बसले होते त्यामुळे त्यांच्यावर देखील ‘साइलेंस’ म्हणत ती जोरात ओरडली. तिला ओरडताना पाहून काही काळ सगळेच गप्प बसले. तिच्या अशा ओरडण्याने शांतता पसरली. प्रश्न विचारताना एका पत्रकराने गेले काही वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर का राहिली असा सवाल तिला विचारला तेव्हा त्या पत्रकारावरही ती नाराज झाली. आपण प्रोडक्शन हाऊस सेट करण्यात व्यस्त असल्याचे सांगत तिने रागातच त्याला उत्तर दिले. अमिषाचे  असे वागणे अनेकांना अनपेक्षितच होते.

‘कहोना प्यार है’, ‘गदर’ यांसारखे यशस्वी चित्रपट दिलेली अमिषा ही अलीकडाचा काळ बॉलीवूडपासून लांबच होती. ‘रेस २’ नंतर ती चित्रपटांत दिसली नाही. आता तिचा ‘भैय्या जी सुपरहिट’ हा चित्रपट येत आहे. यात ती सनी देओल सोबत दिसणार आहे. याआधी तिने सनीसोबत ‘गदर’ या चित्रपटात काम केले होते. या नव्या चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी  पत्रकरांना बोलावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 3:48 pm

Web Title: amisha yelled at journalist
Next Stories
1 समाजसेवेसाठी सोनाक्षीने काढलेल्या चित्राचा लिलाव..
2 लांबलचक चर्चेनंतर शेवटी जीएसटी पास झाले – बिग बी
3 टीम इंडियासाठी ‘ढिशूम’चे स्पेशल स्क्रिनिंग
Just Now!
X