06 March 2021

News Flash

‘वेलकम बॅक’ला अमिताभ-रेखा यांचा नकार

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आता अपूर्ण राहणार आहे.

| November 29, 2013 01:58 am

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आता अपूर्ण राहणार आहे. कारण या दोघांनीही एकत्र काम करणार असल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अनिस बज्मीच्या आगामी ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात रेखा आणि अमिताभ ब-याच वर्षांनी एकत्र काम करणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती. मात्र रेखा यांनी तारखांचे कारण देत अनीस बज्मी यांना आपला नकार कळवला आहे. इतकेच नाही तर अमिताभ यांनीही चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.   
रेखा आणि अमिताभ आपला भूतकाळ विसरून या एकत्र काम करण्यास होकार देतील अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र या दोघांनीही चित्रपटाला नकार देऊन चाहत्यांची निराशा केली आहे. ‘वेलकम बॅक’ हा २००७ साली आलेल्या ‘वेलकम’चा सिक्वल आहे. यात फिरोज खान, अक्षय कुमार, कटरिना कैफ, नाना पाटेकर आणि अनिल कपूरची मुख्य भूमिका होती. आता फिरोज खानची डॉनची भूमिका नसिरूद्दीन शाह करणार आहेत, तर रेखा यांचा रोल डिंपल कपाडिया करणार आहे. नाना पाटेकर आणि अनिल कपूरही या चित्रपटात काम करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:58 am

Web Title: amitabh bachchan and rekha said no to welcome back
Next Stories
1 ‘धूम ३’च्या टायटल ट्रॅकमध्ये कतरिनाचीच ‘धूम’
2 पाहा : ‘धूम ३’ चित्रपटातील आमिरच्या परफेक्ट लूकचा व्हिडिओ
3 ही माझी शेवटची दिल्ली भेट – सैफ अली खान
Just Now!
X