करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. मात्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली. २३ दिवसानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. परंतु बिग बींच्या मनातील करोनाची भीती अद्याप गेलेली नाही. ६५ वर्षांवरील कलाकारांना सरकारने चित्रीकरणास मनाई केली आहे. या सरकारी नियमाच्या भीतीमुळे अमिताभ अस्वस्थ आहेत. ६५ वर्षांवरील कलाकारांना कामासाठी आता घराबाहेर पडता येत नाही. मला दुसरं कुठलं काम मिळेल का? असा प्रश्न त्यांनी आपल्या चाहत्यांना विचारला आहे.

अवश्य पाहा – WWE मध्ये नोकर कपात; या सुपरस्टार्सला दाखवला बाहेरचा रस्ता

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग, ट्विट, इन्स्टाग्राम, फोटो, व्हिडीओ अशा माध्यमांद्वारे ते कामय आपले विचार मांडत असतात. यावेळी बिग बींनी एका ऑनलाईन ब्लॉगच्या माध्यमातून करोनाबाबत आपली भीती व्यक्त केली आहे. “सध्या सर्वच जण करोनामुळे त्रस्त आहेत. सरकार, डॉक्टर्स, वैद्यकिय तज्ज्ञ आपापल्या परीने करोनावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही परिस्थिती माझ्यासारख्या ६५ वर्षांवरील मंडळींसाठी अत्यंत भीतीदायक आहे. आम्ही आता मुक्तपणे बाहेर फिरु शकत नाही. कोर्टाने ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी परवानगी दिली खरी, पण ते स्वातंत्र्य अनुभवता येत नाही. मनात कायम भीती राहाते. माझ्यासाठी दुसरा कुठला जॉब असेल तर मला सांगा.” अशा आशयाचा ब्लॉग बिग बींनी लिहिला आहे. अमिताभ कायम सकारात्मक विचार मांडत असतात. आपल्या पोस्टद्वारे ते चाहत्यांना प्रेरणा देतात. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा ब्लॉग चाहत्यांना चकित करणारा आहे.

अवश्य पाहा – ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

https://srbachchan.tumblr.com/ – या लिंकवर क्लिक करुन तुम्ही बिग बींचा पूर्ण ब्लॉग वाचू शकता.