अभिनयाचे शेहनशाह अमिताभ बच्चन ‘बिग बी’ या नावाने ओळखले जातात. हे नाव त्यांना प्रसारमाध्यमांनी दिलेले आहे. आज हे नाव इतके सुप्रसिद्ध आहे की ‘बिग बी’ म्हटल्यावर डोळ्यांपुढे अमिताभ बच्चन यांचाच चेहरा येतो. नुकतंच महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी ‘बिग बी’ यांचा उल्लेख केला आहे. या ट्विटला अमिताभ बच्चन यांनीदेखील रिप्लाय दिला आहे.
With due apologies to @SrBachchan there is only one ‘Big B’ this week…and that’s the Big Budget… https://t.co/DUD6oYTHw8
— anand mahindra (@anandmahindra) July 1, 2019
त्यांनी लिहिले आहे की, ‘माफी असावी अमितजी पण, या आठवड्यात एकच ‘बिग बी’ आहे ते म्हणजे ‘बिग बजेट’. ५ जुलै रोजी केंद्रीय सरकार नवीन बजेट सादर करणार आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या बजेटचीच चर्चा आहे. प्रसारमाध्यमांसह संपूर्ण देशाचे लक्ष या बजेटकडे आहे.
HAHAHA .. @anandmahindra .. ‘BIG B’ is a media created epithet, one that I have never subscribed to .. the ‘BIG B’ this week that you mention, will create media .. that many shall subscribe to https://t.co/W5q0UQSJsb
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 1, 2019
अमिताभ बच्चन यांनी हसत या ट्विटला रिप्लाय देईल आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘बिग बी हे प्रसारमाध्यमांनी मला दिलेले नाव आहे. मी या नावाशी कधीच सहमत नव्हतो. तुम्ही ज्या ‘बिग बी’ चा उल्लेख केला आहे तेच या आठवड्यात मीडियामध्ये दिसेल.’