News Flash

“जलसासमोर गर्दी करु नका”; बिग बींचे चाहत्यांना आवाहन

करोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी अमिताभ यांनी घेतला हा निर्णय

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओ, ट्विट्स यांसारख्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी चाहत्यांना आवाहन करण्यासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. “पुढील काही दिवस माझ्या बंगल्यासमोर गर्दी करु नका” असं अमिताभ म्हणाले आहेत.

“मशहूर होने का शौक़ नहीं मुझे; आप मुझे पहचानते हैं बस इतना काफ़ी है” असा संदेश त्यांनी आपल्या चाहत्यांना या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. संपूर्ण देश सध्या करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे त्रस्त आहे. आतापर्यंत हजारो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बिग बींनी त्यांना पाहण्यासाठी घराजवळ गर्दी न करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. दर रविवारी अमिताभ आपल्या चाहत्यांची भेट घेण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र यावेळी ते करोना विषाणूमुळे घराबाहेर पडणार नाहीत.

अमिताभ यांचे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही चाहत्यांनी या निर्णयावर आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 11:05 am

Web Title: amitabh bachchan cancels meet due to coronavirus mppg 94
Next Stories
1 ‘अभय २’मध्ये राम कपूर दिसणार अनोख्या अंदाजात, शेअर केला फर्स्ट लूक
2 ‘जिंदगी ना मिलेगी दोबाराच्या वेळी फक्त हृतिकला…’, अभय देओलने व्यक्त केला राग
3 भावनिक, मानसिक लिंचिंगमुळे गेला सुशांतचा बळी, कंगनाचा नवा आरोप
Just Now!
X