News Flash

सर्जरीनंतर अमिताभ यांनी शेअर केला पहिला फोटो

त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. शनिवारी अमिताभ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारेच आपल्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती दिली होती. पण कोणती शस्त्रक्रिया? कशामुळे? याबाबत त्यांनी माहिती दिली नव्हती. त्यामुळे चाहत्यांना अमिताभ यांची काळजी सतावत होती. पण आज सकाळीच अमिताभ यांनी ब्लॉग पोस्ट करत डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता त्यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. अमिताभ यांनी त्यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी चष्मा देखील लावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

आजच सकाळी अमिताभ यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर करत आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. “तुमच्या शुभेच्छांबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद. या वयात डोळ्याची शस्त्रक्रिया करणं खूप नाजूक आणि कौशल्याचे काम असते. या बाबतीत सर्वोत्तम उपचार मला मिळालेले आहेत आणि सगळं व्यवस्थित असल्याची मी आशा करतो. माझी दृष्टी आणि बरे होण्याचा वेग जरा कमी आहे, त्यामुळे या पोस्टमध्ये काही चुका असू शकतात. त्याबद्दल मला समजून घ्या” या आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले होते.

त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली होती. जर सगळं व्यवस्थित पार पडलं तर विकास बहलसोबत मी माझ्या नवीन चित्रपटासाठी काम करणं सुरु करू शकेन, ज्याचं नाव सध्या तरी ‘गुड बाय’ असं आहे.

अमिताभ लवकरच आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’या चित्रपटात दिसणार आहेत. तर इम्रान हाश्मीसोबत ते ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ या चित्रपटातही ते काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 7:04 pm

Web Title: amitabh bachchan expresses his gratitude to fans and shares latest pictures avb 95
Next Stories
1 करिश्मा का करिश्मा.. फिटनेस पाहून व्हाल थक्क!
2 काय? सनीला करायचं पुन्हा लग्न, सोशल मीडियावर पोस्टद्वारे व्यक्त केली इच्छा
3 ‘ऍनिमल’चं ठरलं! रणबीर कपूर दिसणार प्रमुख भूमिकेत….