20 January 2021

News Flash

केबीसीमधील स्पर्धकाला अमिताभ यांनी दिलं टोपण नाव

सध्या हा भाग चर्चेत आहे

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीचे १२ वे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे जिंकताना दिसतात. अमिताभ बच्चन आणि शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनामधील संवाद नेहमी चर्चेत असतात. नुकताच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये मध्य प्रदेशातील वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा राव या स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांना अमिताभ यांनी एक मजेशीर नाव दिले आहे. अमिताभ यांनी पहिल्यांदाच कोणत्या स्पर्धकाला टोपण नाव दिल्यामुळे हा एपिसोड चर्चेत आहे.

कौन बनेगा करोडपती शोमध्ये अनेक स्पर्धक अमिताभ यांना आपल्या खाजगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सांगताना दिसतात. त्यात अभिलाषा यांनीही एक किस्सा सांगितला. रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पोस्टवर काम करणारे किंवा जंगलासारख्या ठिकाणी नेहमी पुरुषच काम करतात अशी पूर्वी पासूनची धारणा लोकांमध्ये आहे. त्यामुळे अनेक वेळा लोक मला रेंज फॉरेस्ट सर बोलतात पण जेव्हा ते माझा आवाज ऐकतात तेव्हा ते त्यात सुधारणा करत मला रेंज फॉरेस्ट सर मॅडम बोलतात.

हे ऐकल्यानंतर अमिताभ यांना हसू येते. ते म्हणतात की मी आता तुम्हाला अभिलाषा रेंज ऑफिसर सर मॅडम या नावाने आवाज देणार. दरम्यान अभिलाषा यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या छंदाबाबत अमिताभ यांना सांगितले. अभिलाषा यांनी काही फोटो देखील अमिताभ यांना दाखलवे. ते फोटोपाहून अमिताभ आश्चर्यचकित झाले त्यांनी अभिलाषा यांची स्तुती केली. दरम्यान, अभिलाषा यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये १२ लाख ५० हजार रूपये जिंकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 6:27 pm

Web Title: amitabh bachchan gave a nickname to the contestent of kbc12 dcp 98 avb 95
Next Stories
1 रुग्णालयातून ‘खेळ मांडला’; अभिजीत केळकरचा व्हिडीओ व्हायरल
2 अनुष्का आणि विराटकडे आहे इतकी संपत्ती, जाणून घ्या त्या विषयी
3 ‘तारक मेहता..’मधल्या ‘माधवी भाभी’ने शेअर केला रिअल लाइफ पतीचा फोटो
Just Now!
X